⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | बाप रे..! रावेरात शौचालय योजनेत दिड कोटीचा भ्रष्ट्राचार

बाप रे..! रावेरात शौचालय योजनेत दिड कोटीचा भ्रष्ट्राचार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशनंतर्गत गरीबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्याससाठी मिळणाऱ्या अनुदानात ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान १ कोटी ५२ लाख ६४ हजार रूपयांचा भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी येथील पोलिसांत दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. यामुळे भ्रष्ट्राचार करणा-यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

“स्वच्छ भारत मिशन” ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांशी योजना असून गाव हगणदारी मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार वैयक्तीक शौचालयच्या माध्यमातुन प्रोत्साहन म्हणून बारा हजार रुपये देते. याच योजनेत मोठा भ्रष्ट्राचार झाला आहे. या प्रकरणी २० एप्रिल रोजी पहाटे चार वाजता पंचायत समिती येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल चौधरी यांच्या फिर्यादी वरुन समाधान निंभोरे व मंजुश्री पवार यांच्याविरुध्द रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक तपास करीत आहे.

कोटींचा भ्रष्ट्राचाराचा आरोप

रावेर पोलीसात दाखल गुन्ह्यात दोघांवर पुढीलप्रमाणे आरोप ठेवण्यात आले आहे. यामध्ये गट समन्वय समाधान निंभोरे यांनी ओळखीच्या लोकांच्या खात्यावर स्वच्छ भारत मिशनच्या खात्यावरुन १ कोटी ५१ लाख ६१ हजार ५३३ वर्ग केल्याचा आरोप आहे. तसेच स्वता:च्या खात्यावर १२ हजार प्रमाणे ३३ वेळा ६ लाख ४ हजार ४७७ रुपये वर्ग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.तसेच समूह समन्वयक मंजुश्री पवार यांनी १२ हजार रुपये प्रमाणे ३५ ओळखीच्या लाभार्थीच्या नावे ४ लाख २० हजार वर्ग करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच बीडीओ यांच्या खोट्या स्वाक्ष-यांच्या याद्या बँकेला दिल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.

या कलमान्वय आहे. गुन्हा दाखल

गरीबांच्या शौचालयात सुमारे दिड कोटी रूपयांचा भ्रष्ट्राचार केला म्हणून विविध कलमान्वय गुन्हा दाखल आहे. कलम ४०६ विस्वासघात करणे. कलम ४२० फसवणुक करणे. कलम ४०९ ताब्यातील मालमत्तेचा दुरुपयोग करणे. कलम ४६५ बनावटी करण करणे. कलम ४७१ बनावट दस्ताऐवज तयार करणे. कलम ३४ प्रक्रियेत सहभाग या प्रश्नाचे उत्तरे मिळतील का ? दोघ गट समन्वयकांनी भ्रष्ट्राचार केला असेल तर इतके महीने लेखापाल यांनी याद्या व बँकेच्या खातीची पडताळणी का.? केली नाही. भ्रष्ट्राचा-याच्या याद्यांवर बिडिओंच्या डुबलीकेट सह्या असेल तर बीडीओंच्या ओरिजनल सह्या असलेल्या यादीतील लाभार्थांनी खरच शौचालय बांधलित का.? गट समन्वयक यांनी स्वताच्या खात्या मध्ये सहा लाख टाकली असेल तर दिड कोटी हळप करणारे ते व्हीआयपी कोन.? स्वच्छ भारत मिशनच्या बँक खात्यावरुन अनुदान लाटणारे ते व्हीआयपी लाभार्थी कोण.?हे सर्व कोणाच्या आशिर्वादामुळे सुरु होते. खरच दोघे गट समन्वयकांना दोषी आहे की संपूर्ण साखळीचा यात दोषी आहे.या प्रश्नाची उत्तरे जनतेला अपेक्षित आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह