नगरसेवकाचा कारनामा : अफवा पसरवणे पडलं महागात ; धान्य दुकानाचा परवाना रद्द !
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२३ । स्वस्त धान्य दुकानदार असलेले जळगाव शहरातील शिंदे गटाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमाच्या नावाखाली व्हाट्सअप ग्रुप वर मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमास हजर न राहिल्यास त्या कार्डधारकांचे तीन ते चार महिने रेशन बंद राहील असा इशारा दिला होता. याची नोंद घेत त्यांचा धान्य दुकान परवाना निलंबित करण्यात आला आहे.
सर्व रेशन कार्डधारकांना हजर राहणे बंधनकारक असल्याचे त्यांनी व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज टाकले होते. या कार्यक्रमात महत्त्वाच्या सूचना देण्यात येणार आहेत व कार्डधारकांची नोंद घेतली जाईल. यामुळे सर्व ग्राहकांनी हजर राहणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले होते.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नावाखाली व्हाट्सअप ग्रुप वर लाभार्थ्यांची दिशाभूल निर्माण करणारे हे मेसेज होते. याचबरोबर यापूर्वी स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना वेळेवर धान्य देत नसल्याच्या तक्रारी येत होत्या.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जळगाव शहरात आले होते. यासाठी नागरिकांची गर्दी व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांना अमित दाखवली जात असल्याची चर्चा संपूर्ण शहरात रंगली होती. याचबरोबर नागरिकांना धमकल ही जात असल्याचे म्हटले जात होते. अशातच दारकुंडे यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे यात काही प्रमाणात तथ्य असल्याचे पाहायला मिळत आहे.