जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली होती. मात्र, मंगळवारी नव्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ झाली होती. दरम्यान, बुधवारी दिवसभरात तब्बल ४६९ कोरोना रुग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार २५४ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५८० बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता २ हजार ८६८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत असून नागरीकांनी आपल्या सह आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात दिवसभरात ४६९ रूग्ण आढळून आले आहे. तर ७९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. यात जळगाव शहर-१२६, जळगाव ग्रामीण-२२, भुसावळ-११८, अमळनेर-३७, चोपडा-५५, पाचोरा-१३, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-६, एरंडोल-४०, जामनेर-८, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-३३, मुक्ताईनगर-४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४६९ बाधित रूग्ण आढळले आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात कोरोनाची एंन्ट्री; एक जण कोरोना पॉझिटिव्ह
- सावधान! कोरोनानंतर आता ‘या’ धोकादायक आजाराचे जगात थैमान ; WHO कडून अलर्ट जारी
- वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय सुरू करावे ; शरद पवारांचा अशोक जैन यांना सल्ला
- धोक्याची घंटा! नव्या कोरोना व्हेरिएंट ‘इरिस’ची यूकेत लाट, भारतासाठी धोका?
- ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे दुष्परिणाम; पदवीच्या अंतिम वर्षात ६७ टक्के विद्यार्थी ‘नापास’