---Advertisement---
कोरोना राष्ट्रीय

सावधान ! भारतात कोरोनाची पुन्हा एन्ट्री, महाराष्ट्र्रातही आढळले ‘एवढे’ रुग्ण?

corona
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड या आशीयाई देशांमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत असून याच पार्श्वभूमीवर भारतही सतर्क झालाय. कारण देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोनाचे ९३ रुग्ण आढळून आले असून यात ५३ रुग्ण महाराष्ट्रामधील आहेत.

corona

विशेष राज्यातील राजधानी मुंबईत कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतही रुग्णांच्या वाढत्या संख्येनं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती आहे. पुण्यातील एका रुग्णालयात वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

---Advertisement---

देशात एकूण रुग्णांची संख्या 93 आहे. यापैकी 85 टक्के रुग्ण म्हणजेच 46 रुग्ण तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमधील आहेत. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातही कोरोनाचा शिरकाव झालाय. अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोना झाला आहे. तर दुसरीकडे आयपीएलमधील काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद टीमचा खेळाडू ट्रेव्हिस हेडची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. आता कोरोनाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर ही संख्या चिंतेची बाब आहे. अनेक रुग्णांमध्ये ताप आणि कोरोनाची लक्षणे आढळली आहेत.

मुंबईतही गेल्या 2 महिन्यांत कोरोनाचे 15 रुग्ण आढळून आले. मागील आठवड्यात आठ रुग्णांना कोरोनाची लागण झालीय. मुंबईच्या केईएम रुग्णालयात दोन कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यातील एक किडनी तर एका रुग्णाला कॅन्सर झाला होता. पण हे मृत्यू कोविड-19ने झाले नसल्याचा स्पष्ट दावा रुग्णालय प्रशासनानं केला आहे. दरम्यान, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असं तज्ञांनी सांगितलंय

काय काळजी घ्याल?
नागरिकांनी मास्क वापरावा
डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा
वारंवार हात धुवावे, स्वच्छता बाळगावी
डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषधं घ्या
हलक्या आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment