⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

चाळीसगावात 93 हजार जणांना कोरोनाची लस

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२१ । कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करत असताना सोबतच कोरोना प्रतिबंधक लस महत्त्वपूर्ण असल्याने नागरिकांचा कल हा लसीकरणाकडे वळला आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी चाळीसगावात आतापर्यंत 93 हजार जणांना कोरोनाची लस देण्यात आलीय.

जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 96 हजार 938 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 3 लाख 15 हजार 916 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 12 लाख 12 हजार 854 लाभार्थ्यांना कोरोना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

जिल्ह्यात 16 जानेवारी 2019 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरू केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात केली.

तालुकानिहाय आकडेवारी नुसार चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत 93 हजार 781 लसीकरण टप्पा पूर्ण झालेला आहे. व इतर नागरिक देखील लवकरातलवकर लसीकरण करून घेण्याच्या तयारीत आहे.