जिल्ह्यातील कोरोनाची गती कमी होईना ; आज ११६७ नवे रुग्ण

एप्रिल 1, 2021 7:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज ।०१ एप्रिल २०२१ । जिल्ह्यातील कोरोनाची गती काही कमी होतानाचे दिसून येत नाहीय. मागील काही दिवसापासून अकराशे ते बाराशे पर्यंत रुग्ण आढळून येत असल्याची मालिका आजही कायम आहे. आज जिल्ह्यात तब्बल ११६७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर दिलासादायक असा कि आज ११४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

corona

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, जळगाव शहरात मागील काही दिवसापासून कोरोनाने कहर केला होता. मात्र आज शहरात १०१ रुग्ण आढळून आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु आता चोपडा तालुक्यात कोरोनाचा स्थिती गंभीर होत चालली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज  ११६४ आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ९० हजार १८५ झाली आहे. तर आज ११४४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार ७३४ वर गेली आहे. दरम्यान, आज १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १६३८ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ८१३ रुग्ण उपचार घेत आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर १०१, जळगाव तालुका १४, भुसावळ १२६, अमळनेर १२२; चोपडा ३०७; पाचोरा २८; भडगाव ६५; धरणगाव ४६; यावल ५६; एरंडोल २७, जामनेर ७७; रावेर ६५, पारोळा १९; चाळीसगाव ५९; मुक्ताईनगर २१; बोदवड ३१ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे ११६७ रूग्ण आढळून आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now