जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२१ । लॉकडाऊन नंतर जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी झपाट्याने कमी होत आहे. रोज हजारांच्या पलीकडे असणारा कोरोना बाधितांचा आकडा सध्या हजाराच्या खाली येतोय.
एकीकडे जळगाव जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असतानाच जिल्ह्यात फेब्रुवारीच्या महिन्यात कोरोनाने डोख वर काढले आणि ही दुसरी लाट अधिक तीव्रतेने पसरू लागली. मार्च व एप्रिलमध्ये तीव्रता प्रचंड वाढून रोज हजार, बाराशेपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, या स्थितीत गेल्या मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे.
आज जळगाव शहर-१७१, जळगाव ग्रामीण- ६४, भुसावळ-६९, अमळनेर-२४, चोपडा-४४, पाचोरा- २८, भडगाव-१०, धरणगाव-२०, यावल-१९, एरंडोल-७३, जामनेर-५७, रावेर-६४, पारोळा-१५, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-२३, बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यातील २८ असे एकुण ८०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आज ५ हजार ३६४ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८०२ नवे बाधित रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख २४ हजार ४६ वर पोचली. तर आज १ हजार ९९ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १२ हजार ३५६ वर गेला आहे. तर १९ जणांच्या मृत्यूने बळींची संख्या २ हजार २३५ वर पोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या १० हजार ५५ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
जळगाव शहरासाठी दिलासा
मागील काही दिवसापासून जळगाव शहरात नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या शहराला हा दिलासादायक आहे. आज जळगाव शहरात १७१ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आजच २०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णसंख्याही घटत आहे. शहरात सध्या १ हजार ६४४ रुग्ण उपचार घेत आहे. शहरात आजपर्यंत ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे.