कोरोना

जळगाव जिल्ह्यात आज नवे ९ बाधित आढळले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे ०९ बाधित रुग्ण आढळून आहे. तर आज ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही मृत्यूची नोंद नाहीय. आज जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाहीय.

जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख उतरताच आहे. मागील काही दिवसापासून नवीन रुग्ण सख्या १० च्या आत आढळून येत आहे. आजच्या रुग्णानंतर जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १,४२,५८८ इतकी झाली आहे. त्यात उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ९३० वर आहे. जिल्ह्यात सध्या ८३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय. जिल्ह्यात आज पर्यंत २५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.१४ वर गेला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-००, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ -०१, अमळनेर -००, चोपडा-०२, पाचोरा-०२, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर -००, पारोळा-०, चाळीसगाव-०४, मुक्ताईनगर-००, बोदवड-०० असे एकुण ७ बाधित रूग्ण आढळले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button