⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

कोरोना अपडेट : आजचे पॉझिटिव्ह ४२८ तर बरे झालेले रुग्ण ५२६, एकाच मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाने थैमान घातले आहे. सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात चारशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. आज शनिवारी कोरोनाचे ४२८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज दिवसभरात ५२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आज पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज जळगाव शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. जळगाव शहरात सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हार ५४७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ८३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार १२७ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८२ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

जळगाव शहर-१३१, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-५०, अमळनेर-४१, चोपडा-८०, पाचोरा-१, भडगाव-१३, धरणगाव-३, यावल-१२, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-३, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-०, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४२८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

हे देखील वाचा :