कोरोनाजळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील आजची अधिकृत कोरोना आकडेवारी : २८ मे २०२१

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी होतांना दिसून येत आहे. जळगावकर सरकारी नियमांचे काटेकोर पालन करत असल्यानेच कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात १६९ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल २७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या तीन चार दिवसांत दुपटीने रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. शिवाय, मृतांचा आकडा देखील खाली असला तरी दिवसभरात ४ जणांचा मृत्‍यू झाला.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. १ मेपासून सातत्याने नव्या बाधितांमध्ये घट होऊन बरे होणाऱ्यांचा आकडा वाढत राहिला. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आता सहा हजारांच्या टप्प्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ५०० झाली. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३० हजार ५५४ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत ०४ जणांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा २५२० एवढा आहे.

जळगाव शहर-२०, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-११, अमळनेर-०, चोपडा-६, पाचोरा-७, भडगाव-५, धरणगाव-०, यावल-२०, एरंडोल-१, जामनेर-२३, रावेर-१२ पारोळा-१२, चाळीसगाव-४२, मुक्ताईनगर-३, बोदवड-४ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Related Articles

Back to top button