⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

कोरोनाचे थैमान थांबेना! जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा चारशेहून अधिक रुग्ण आढळले

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाने थैमान घातले आहे. सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात चारशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. आज शुक्रवारी कोरोनाचे ४१४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज दिवसभरात २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

आज जळगाव शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. जळगाव शहरात सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हार ११९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ३१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २२६ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८१ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

जळगाव शहर-११६, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ-७९, अमळनेर-२०, चोपडा-७८, पाचोरा-१७, भडगाव-५, धरणगाव-४, यावल-१, एरंडोल-४, जामनेर-३२, रावेर-०, पारोळा-१६, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४१४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

हे देखील वाचा :