fbpx

दिलासादायक : नवीन बाधितांचा आकडा ४०० च्या आत !

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थितीत सुधार दिसून येत आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नव्या बाधित रुग्णापेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक असल्याने जिल्ह्याला दिलासा देणारी बाब आहे. आज गुरुवारी दिवसभरात ३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या अनेक महिन्यात पहिल्यांदाच हा आकडा ४०० च्या आत आहे.

गेल्या २४ तासात १० जणांचा बळी गेला आहे. मे महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारू लागली. १४ एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम आता दिसू लागला आहे. आज गुरुवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत नवे केवळ ३५७ रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ३७ हजार १३६ वर पोचली, तर ६७५ रुग्ण दिवसभरात बरे झाले असून, बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २५ हजार ५५३ वर पोचला आहे. दरम्यान,  गेल्या २४ तासांत १० बळींची नोंद झाली. त्यामुळे एकूण बळींची संख्या २ हजार ४६० वर पोचली आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-४४, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-४७, अमळनेर-१५, चोपडा-४७, पाचोरा-४, भडगाव-५, धरणगाव-२, यावल-१०, एरंडोल-०, जामनेर-१३, रावेर-२०, पारोळा-९, चाळीसगाव-३९, मुक्ताईनगर-४०, बोदवड-२९ आणि इतर जिल्ह्यात ७

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज