---Advertisement---
जळगाव शहर

एसटीचे आर्थिक गणित बिघडले : प्रवासी फेऱ्या झाल्या कमी !

bus
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला असून यामुळे जळगाव आगारातील एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे. गेल्या ५ दिवसांत एसटीच्या रोजच्या होणाऱ्या २०० फेऱ्या आता केवळ ४ ते ५ फेऱ्या होत आहेत. त्यामुळे गेल्या १५ ते १९ एप्रिल या पाच दिवसांत एसटीने २५ फेऱ्यांद्वारे केवळ २ हजार किलोमीटर धावत ३ लाख उत्पन्न मिळवल्याने एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे.

bus

कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने १५ दिवसाचा लॉकडाऊन लावला आहे. तो ३० एप्रिलपर्यंत असणार आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा बजावत असलेल्या लोकांसाठीच एसटी धावत असल्याने अशा नागरिकांचा प्रतिसादही कमी आहे. गेल्या पाच दिवसांत २५ फेऱ्यांद्वारे एसटीला २ हजार किलोमीटर प्रवास करत केवळ ३ लाख उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे एसटीचे दररोजचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. १४ एप्रिलपासून राज्यासह जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असल्याने एसटीचे गणित बिघडले आहे.

---Advertisement---

जळगाव आगारातून गेल्या १५ ते १९ एप्रिल या ५ दिवसांत दररोज ४ ते ५ बसच धावत आहेत. यातून एसटीला केवळ ३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे एसटीला लाखो रुपयांचा तुटवडा होत आहे. प्रतिसादही कमी आहे. गेल्या पाच दिवसांत २५ फेऱ्यांद्वारे एसटीला २ हजार किलोमीटर प्रवास करत केवळ ३ लाख उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे एसटीचे दररोजचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. १४ एप्रिलपासून राज्यासह जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असल्याने एसटीचे गणित बिघडले आहे.लाॅकडाऊनमुळे प्रवासी नसल्याने सध्या बसस्थानकात असा शुकशुकाट असताे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---