वाळूचे ट्रॅक्टर पलटी होऊन तरुण चालक ठार ; जळगाव तालुक्यातील घटना

मे 28, 2025 5:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२५ । वाळूचे ट्रॅक्टर पलटी होऊन १९ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील धानोरा रस्त्यावर आज २८ मे रोजी घडली. विश्वनाथ आधार भील (वय १९, रा. शिरसोली, ता. जळगाव) असं मृत चालकाचे नाव असून या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

शिरसोली येथे वास्तव्यास असलेला विश्वनाथ भील हा मोहाडी गावातील वाळू ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता.घटनेच्या दिवशी विश्वनाथ ट्रॅक्टरने वाळू आणून परत येत असताना धानोरा गावाजवळील पोल्ट्री फार्मजवळ ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. ट्रॅक्टरखाली दबून विश्वनाथचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी मदतीस धाव घेत त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी विश्वनाथला मृत घोषित केले.

एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी रुग्णालयातच आक्रोश केला. दरम्यान, ट्रॅक्टर मालकाने मोबाईल बंद केला असून, तो रुग्णालयात हजर होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment