⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | कोरोना | जिल्ह्यात कोरोना विस्फोट : चार दिवसात रुग्णसंख्या झाली चौपट, आज १७९ रुग्ण

जिल्ह्यात कोरोना विस्फोट : चार दिवसात रुग्णसंख्या झाली चौपट, आज १७९ रुग्ण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाने (Corona) पुन्हा हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसापासून नव्या बाधितांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. केवळ चारच दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी तीन अंकी संख्या गाठली असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात १७९ बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रान्वये दिली आहे. यात जळगाव (Jalgaon) शहरासह चाळीसगाव आणि भुसावळ तालुक्यात रूग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून नव्या बाधितांची संख्या ५ च्या आत येत होती. परंतु देशभरासह राज्यात कोरोनाचा नवा प्रकार ओमिक्रोन आढळून आल्यानंतर कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात देखील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांमध्‍ये आकडा डबलने वाढला असून आज आकडा चौपट झाला आहे.

आज जळगाव जिल्ह्यात एकुण १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३०६ बाधित रूग्ण (Corona Positive) आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर, भुसावळात सर्वाधिक रुग्ण

आजच्या बाधितांचा आकडा १७९ वर पोहचला असून भुसावळ, चाळीसगाव तालुक्‍यासह जळगाव शहराची अधिक चिंता वाढली आहे. आजच्‍या बाधितांमध्‍ये जळगाव शहरात ६४, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ७३, अमळनेर १, चोपडा २, पाचोरा २, धरणगाव १, जामनेर ५, रावेर २, चाळीसगाव १६, मुक्ताईनगर २, बोदवड ५ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १७९ बाधित रूग्ण आढळले आहे. आता जिल्ह्यात ४७३ बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. आज दिवसभरात १६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.