जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । सध्या जळगाव जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती भीषण होत असून देखील नागरिकांमध्ये कोरोनाविषयी बेफिकिरी पाहावयास मिळत आहे. याचमुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आणि कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी रात्री ९ नंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची पोलिसांकडून रस्त्यावरच अँटीजन टेस्ट केली आहे.
दिनांक १३ एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी रात्री बाहेर फिरणाऱ्या ८० जणांची कोरोना अँटीजन टेस्ट करण्यात आली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सोडून देण्यात आले. काव्यरत्नावली चौकात पोलिसांनी अचानक कारवाई सुरु केल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.