जळगाव लाईव्ह न्युज | CORONA ALERT | जळगाव जिल्ह्यात येत्या दोन आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसेच सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी ही माहिती ‘जळगाव लाईव्हशी’ बोलताना दिली.
यावेळी बोलताना डॉक्टर इंगोले म्हणाले की, जिल्ह्याने कोरोनाचा तडाखा दोन लाटांमध्ये पाहिला आहे. यानंतर सुद्धा नागरिक कोरोना बाबत गाफील झाले आहेत. मात्र आता नागरिकांनी स्वतःची कोरोना पासून सुरक्षा करणे अतिशय गरजेचे आहे कारण ती न केल्यास लवकरच जिल्ह्यात कोरोनाची तिसरी किंवा चौथी लाट येऊ शकते असा अंदाज आहे.
जिल्ह्यातील कित्येक नागरिकांनी अजूनही लसीकरण करून घेतले नाहीये. यामुळे अशा नागरिकांनी लवकरात लवकर covid-19 चे लसीकरण करून घेणे अतिशय गरजेचे आहे. कारण नागरिकांना कोरोणा पासून वाचवण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ कोरोनाच्या लसी मध्येच आहे. याच बरोबर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी आता वेळोवेळी कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करणे अतिशय गरजेचे असल्याचेही यावेळी त्यांनी ‘जळगाव लाईव्हशी’ बोलताना सांगितले.
जळगाव जिल्ह्यात या क्षणाला चार कोरोनाच्या ॲक्टिव्ह केसेस आहेत. तर दुसरीकडे गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात एकाही कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली नव्हती. मात्र आता ती करण्यात आली आहे. एकदम चार रुग्ण जिल्ह्यात आढळले असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील चार पैकी तीन रुग्ण चोपडा तालुक्यातील एकाच कुटुंबातले असून एक रुग्ण हा जळगाव शहरातले आहे