सुरक्षा रक्षकांचा पहारा, तरी 40 लाखांची कॉपर वायर चोरीला; दीपनगरातील घटना

ऑक्टोबर 4, 2025 4:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढत असल्याचं दिसत आहे. अशातच दीपनगर येथील परिसरात सुरक्षा रक्षकांचा पहारा असतांनाही १३२/ ३३ केव्ही उपकेंद्राच्या आवारातून सुमारे ४० लाख रुपयांची कॉपर वायर चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. दीपनगर केंद्रात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

crime 2 jpg webp

या प्रकरणी दीपनगर येथील पारेषण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ब्रिजेंद्रकुमार बुद्धसेन पटेल (रा. गुलमोहर प्रेस्टीजवळ, भुसावळ, मुळ रा. रघुराज नगर, जि. सतना, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार २७ सप्टेंबर २००९ ते २७ मे २०२५ या काळात अज्ञात चोरट्यांनी १३२/ ३३ केव्ही उपकेंद्राच्या ईसीआर आवारात असलेल्या जळालेल्या ट्रान्सफॉर्मरमधून ३९ लाख ३७हजार ५०० रुपयांची तांब्याची तार लांबवल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दीपनगर केंद्रात झालेली ही चोरी २७ मे २०२५ रोजी उघड झाल्यावर सुद्धा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास पाच महिने लागल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. सन २००९ पासून चोरी होत असताना सुरक्षारक्षक व अधिकाऱ्यांना हा प्रकार का लक्षात आला नाही असा प्रश्न आहे. भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड तपास करता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now