चाळीसगावमध्ये शिवजयंतीत वाद; एपीआयची तडकाफडकी बदली

फेब्रुवारी 19, 2026 6:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२६ । चाळीसगाव शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणुकीदरम्यान गाडी पार्किंगच्या कारणावरून शिवप्रेमी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या झालेल्या वादानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

CLS API Bharat chaudhari

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीच्या मार्गावर वाहन उभे करण्याच्या मुद्द्यावरून शिवप्रेमी आणि एपीआय भरत चौधरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा वाद वाढत असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Advertisements

मात्र या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी एपीआय भरत चौधरी यांची तात्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेनंतर शहरात शांतता असून पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now