चाळीसगाव हादरले! रिक्षासाठी पैसे देण्यास नकार.. संतप्त मुलाकडून जन्मदात्या पित्याची हत्या

फेब्रुवारी 16, 2026 4:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरामधून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षा घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून मुलाने जन्मदात्या पित्याची काठीने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना एम.जी. नगर परिसरात घडली. भिकन मोरे (वय ६८) असं मयताचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

crime 2 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, भिकन मोरे हे पत्नी सखुबाई मोरे आणि मुलगा कल्पेश मोरे यांच्यासोबत राहत होते. कल्पेश मोरे हा गेल्या काही दिवसांपासून रिक्षा खरेदीसाठी वडिलांकडे पैशांची मागणी करत होता. यावरून घरात वारंवार वाद होत असायचे.

शनिवारी सायंकाळी पुन्हा याच कारणावरून घरात तीव्र वाद झाला. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या कल्पेशने काठी तसेच कमरेच्या पट्ट्याने भिकन मोरे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी कल्पेश मोरे याला अटक केली. पत्नी सखुबाई मोरे यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली वृद्ध पित्याचा मुलाकडून झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now