⁠ 
शनिवार, मे 11, 2024

”कुत्ते की मौत होती है, वैसे ही..” पंतप्रधान मोदींवर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केल्याच्या निषेधार्थ देशभरातून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरून मोदी सरकार विरोधात निषेध करत आहे. याच दरम्यान, नागरपूरमध्ये आज काँग्रेस नेते शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याप्रकरणी नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख हुसैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप असून पोलिसांनी काल रात्री कलम 294 (अश्लील कृत्य) आणि 504 IPC (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

शेख हुसेन हे नागपुरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही राहिले आहेत. भारतात बेरोजगारी वाढत असल्याचे त्यांनी एक दिवसापूर्वी काँग्रेसच्या कामगिरीत म्हटले होते. त्यांना रोजगारक्षम बनवा. शेतकऱ्यांचे प्रश्न संपवण्यासाठी काम करा. निरुपयोगी गोष्टी करणे थांबवा. अन्यथा….सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काही झाले तर देशात आग लागेल, देशाच्या विकासासाठी जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून निवडले आहे. काँग्रेसने 70 वर्षात जे केले त्याचे नाव विकून तुम्ही देश चालवत आहात अस त्यांनी म्हंटल. शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केले तेव्हा महाराष्ट्र सरकारचे दोन मंत्रीही जागेवर बसले होते.

नेमकं काय म्हणले शेख हुसैन?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू असा होईल की… कुत्ते की मौत होती है, वैसे ही नरेंद्र मोदीजी की मौत होगी…. असे ते बोलून गेलेत. आपल्या या विधानासाठी एखादी नोटीसही येईल, पण याची मला काही परवा नाही, असेही शेख हुसेन यावेळी आक्रमक भाषणा दरम्यान बोलून गेले.

https://twitter.com/MVAGovt/status/1536920435358572544

दरम्यान, मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपने शेख हुसेन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नागपूर येथील गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 294 आणि 504 आयपीसी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शेख हुसेन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.