मुक्ताईनगरमध्ये गोंधळाचं वातावरण; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या, नेमकं काय घडलं?

डिसेंबर 2, 2025 4:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२५ । राज्यात नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील देखील १८ नगरपालिका निवडणूकीसाठी आज 2 डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे‌. याच दरम्यान मुक्ताईनगरमध्ये अनपेक्षित गोंधळ निर्माण झाला.

mt

भाजपच्या खासदार आणि मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला अडवल्याच्या कारणातून रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. या दरम्यान काही मिनिटे तीव्र शाब्दिक चकमक झाली. या प्रकारामुळे जुन्या शहरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Advertisements

नेमका वाद कशावरून?

Advertisements

जुने शहरात मतदान सुरळीत सुरू असताना भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी किंवा कार्यकर्त्यांना नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वाहनांना पोलिसांनी अडवले. ही माहिती मिळताच रक्षा खडसे तातडीने त्या ठिकाणी गेल्या आणि वाहनांना अडवल्याबाबत पोलिसांना विचारणा केली. त्यावर घटनास्थळी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी मंत्री खडसे यांना सांगितले की, ते विशेष बंदोबस्तासाठी पुण्याहून आले असून स्थानिक पक्षनेते किंवा कार्यकर्ते कोण आहेत याची त्यांना माहिती नाही. त्यांनी स्पष्ट केले की, ते केवळ दिलेल्या आदेशांनुसारच काम करत आहेत.

पोलिसांचे उत्तर ऐकल्यानंतर रक्षा खडसे यांनी वारंवार होणाऱ्या अडथळ्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, नियम सर्वांना सारखे लागू केले पाहिजेत. सगळ्यांवर एकच नियम लागू करा. आमच्या वाहनांना अडवणार असाल तर इतरांचेही वाहने थांबवा, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.काही काळ परिसरात तणाव वाढला असला तरी निवडणूक आयोग आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेतून निवडणुकांदरम्यान सर्वच राजकीय पक्षांसाठी समान नियम पाळण्याचा आग्रह अधिक ठळकपणे समोर आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now