जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । जामठी बोदवड तालुक्यातील येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकताच राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. यात येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीनाथ चौधरी व डॉ.विरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून, जनजागृती करण्यात आली.
तसेच गावात कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. डेंग्यू आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती कशी होते तथा या वर कशा प्रमाणे नियंत्रण आणले जाऊ शकते याबाबत सखोल असे मार्गदर्शन प्राथमिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीनाथ चौधरी यांनी केले. घराच्या आजुबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून टायर, नारळाच्या करवंट्या, फुटलेली भांडी, तथा अन्य वस्तू घराच्या आजुबाजूला पडलेल्या असल्यास, त्या त्वरीत नष्ट कराव्या. तसेच घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. त्यामुळे अशा वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही. हे डास स्वच्छ पाण्यातच तयार होतात. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा मार्गदर्शन करण्यात आले. डाॅ. श्रीनाथ चौधरी यांनी केले. डाॅ.विरेंद्र पाटील, के.पी.शहाणे, आरोग्य सहाय्यक एस.एस.पाटील, आर.बी.सरताळे, गजाजन माळी, के.जी.कुवारे, योगेश इंगळे उपस्थित होते.