जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । मुदत पूर्ण होऊनही ठेवीची रक्कम परत मिळाली नाही म्हणून ठेवीदाराने संतोषी माता मर्चंट को.ऑप क्रेडिट सोसायटी विरूद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. यावर ग्राहक मंचने दसादशे ९ टक्के व्याजासह तसे शारीरिक त्रासापोटी १० हजार रुपये व तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

संतोषी माता मर्चंट सोसायटीत ठेवीदार रमेश तायडे यांनी ठेव रक्कम जमा केली होती. मुदत पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम परत मिळावी, अशी मागणी केली. पण, संस्थेने पैसे न दिल्याने त्यांनी १० ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यावर मंचने वरील आदेश दिले. ठेवीदाराची मुदत देय एकुण रक्कम १ लाख ११ हजार १० रुपये अशी आहे. तक्रारीचा निकाल सहा महिन्यांत पूर्ण झाला. आयोग प्रभारी अध्यक्ष पूनम मलिक व सदस्य सुरेश जाधव यांनी आदेश दिला. ठेवीदारातर्फे ऍड. राजेश उपाध्याय यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






