जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीत लाभार्थी असून देखील विविध कार्यकारी सोसायटीने बेकायदेशीपणे वसुली काढली होती. संबधित शेतकाऱ्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने सोसायटीला दणका देत शेतकऱ्याच्या बाजुने निकाल दिला आहे.
संतोष देवराम पाटील (रा.धानोरा, ता.चोपडा) यांची वडिलोपार्जित शेती आहे. अल्प पावसामुळे पुरेसे उत्पन्न न झाल्याने ते ३१ मार्च २०१६ रोजी दीड लाख रुपयांच्या पीक कर्जाची मुद्दल व व्याजाची रक्कम फेडू शकले नव्हते. त्यामुळे ते थकबाकीदार झाले होते. नंतर शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत लाभार्थी होऊन त्यांनी ओटीएसद्वारे (एक वेळ समझोता योजना) १ लाख २२ हजार ५०६ रुपये भरले होते. त्यामुळे उर्वरीत २२ हजार १५० रुपये थकबाकी माफ देणे क्रमप्राप्त होते. तरी देखील सोसायटीने कर्ज माफी दिली नाही. कोणतीही बाकी नसल्याबाबतचा दाखला दिला नव्हता. त्यामुळे पाटील यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीश सुरेश जाधव, पुनम मलीक यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने धानोरा विविध कार्यकारी सोसायटीने पाटील यांना कोणतीही बाकी नसल्याचा दाखला द्यावा, उर्वरीत २२ हजार १५० रुपये माफ करण्यात आले. तसेच पाटील यांना शारिरीक व मानसिक त्रासापोटी पाच हजार व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी तीन हजार रुपये अदा करावेत असा निकाल दिला. पाटील यांच्यातर्फे ऍड. प्रवीण झंवर, अशोक महाजन व हेमंत भंगाळे यांनी काम पाहले.
हे देखील वाचा :