जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२५ । राज्यात सध्या महानगरापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीसाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.त रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपका, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, अमित देशमुख, अझरूद्दीन, राज बब्बर अशा दिग्गज नेत्यांची नावे आहेत.

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका संपून निकाल लागल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महापालिका निवडणुकीकडे वळवला आहे. राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कबंर कसली आहे. काँग्रेस पक्षाने देखील जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका आणि रणनितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता ४० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे.

यादीमध्ये यांच्या नावाचा समावेश?

काँग्रेसच्या महापालिका निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, छत्रपती शाहू महाराज, सतेज उर्फ बंटी पाटील, मुकुल वासनिक, रेवंत रेड्डी, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट बाळासाहेब थोरात, माजी क्रिकेटपटून मोहम्मद अझरूद्दीन, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसिम खान, राज बब्बर, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अमिन पटेल, नितीन राऊत, सुनील केदार, अमित देशमुख, विश्वजित कदम, भाई जगताप, अनिल अहेमद, रमेश बागवे, हुसेन दलवाई, साजीद खान पठाण, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, वसंत पुरके, मुझफ्फर हुसेन, एम. एम. शेख, मोहन जोशी, वजाहत मिर्झा, अतुल लोंढे, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, हनुमंत पवार यांचीही स्टार प्रचारकांच्या यादीत नावे आहेत.










