---Advertisement---
जळगाव जिल्हा पाचोरा भडगाव

पाचोरा व भडगावात विविध योजनांविषयी आढावा बैठक आयोजित

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । महाराष्ट्र शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेच्या पाचोरा व भडगाव तालुक्यात गुरुवार दि. ३० रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीला सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे. या विशेष आढावा बैठकीला आ.किशोर पाटील हे मार्गदर्शन करणार आहे.

yojna jpg webp

दरम्यान, राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील रस्ताचा आढाव्यासह घरकुल व विविध योजनांचा देखील आढावा आ.किशोर पाटील हे घेणार आहेत.

---Advertisement---

पाचोरा येथे सदरची बैठक गुरुवार दि ३० रोजी सकाळी ११ वाजता स्व.राजीव गांधी टाऊन हॉल याठिकाणी तर भडगाव तालुक्याची बैठक दुपारी ३ वाजता भडगाव पंचायत समितीच्या सभागतुहात होणार असून या बैठकीला पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---