जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । गेल्या विधानसभा निवडणुकीला अभिषेक पाटील यांनी राष्ट्रवादीकडून जळगाव शहरातून निवडणूक लढवल्याने ते चर्चेत आले होते. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. परंतु आता पुन्हा अभिषेक पाटलांचे नाव जामनेरातील व्यापारी संकुल घोटाळ्या प्रकरणी चर्चेत आले आहे.
गेल्या ४-५ दिवसांपासून सोशल मीडियावर अभिषेक पाटील व विनोद देशमुख यांच्यात जोरदार वाक्ययुद्ध रंगल्याचे दिसून येत आहे. यात जामनेरच्या २०० कोटीच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यांची भागीदारी असल्याचा आरोप एका पोस्टद्वारे करण्यात आला आहे. यासंबंधित एक भागीदारीचे एफिडेविट व्हायरल झाल्याची देखील चर्चा आहे. तसेच यासंबंधी व्यक्तिगत टीका करणारे मेसेज देखील सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे.
यासंदर्भात अभिषेक पाटलांनी स्वतः व्हायरल केलेली पोस्ट :
जळगाव जिल्ह्यातील पुन्हा गलिच्छ राजकारणातील एक भाग
आदरणीय स्व. प्रल्हादभाऊ पाटील व मा.रवींद्र भैया ,मा मंत्री देवकर आप्पा , सतीश अण्णा साहेब ,मा अरुण भाई , ईश्वर बाबूजी तसेच इतर पक्षातील प्रमुख नेत्यांनी पक्षासाठी केलेले कार्य हे निश्चितच महान आहे. त्यांच्या बद्दल माझ्याच काय सर्व राष्ट्रवादी पक्षात आदराचे स्थान आहे.
परंतु माघील काही दिवसांपासून माझ्या बद्दल विविध ग्रुप्स वर काही कटकारस्थान करण्याबाबत घडामोडी दिसून येत आहेत . जेणे करून माझी बदनामी व्हावी .(सदरील माणसाला मी जाहीर आवाहन ही केलेले आहे की जे काही पुरावे असतील ते जाहीर करावे अन्यथा कायदेशीर मार्गाने जावे जेणे करून दूध का दूध पाणी का पाणी होईल)
काल सगळी कडे Viral झालेली पोस्ट ही त्या चा एक भाग आहे असे दिसून येत आहे .(काही जवळ च्या कार्यकर्त्यांकडून ही भावनेच्या भरात Share झालेली दिसून आली आहे ) कोणी तरी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काम करत आहे. त्याची divide and rule ही पॉलिसी दिसून येत आहे . असल्या माणसाला मी सांगू इच्छितो की राजकारण हे दिलदार मनाने करायला शिका .
कोणी किती ही खालच्या दराचे राजकारण करा मी अजून सक्षम बनेल .(सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी नम्र विनंती आहे की गैरसमज नसावा . जे प्रामाणिक काम करतात त्या च्या वर असे खालच्या दराचे हल्ले होत असतात. माघे ही यांनी हनी ट्रॅप च्या माध्यमातून मला संपवण्याचा प्रयत्न फेल झालेला असल्या मुळे आता हे नवीन मार्ग शोधला असावा )
अभिषेक शांताराम पाटील
जिल्हाध्यक्ष महानगर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जळगाव.
यावर विनोद देशमुख यांनी एका ग्रुपवर दिलेले प्रतिउत्तर :
आम्ही स्व. नरेन्द्र( अण्णा) भास्कर पाटील यांच्या तालमीत तयार झालेले आहेत पक्का पुरावा असल्या शिवाय बोलणार नाही…. काल जेष्ठ नेते आ. खडसे साहेबांनी पक्ष कार्यालयात सर्वांसमोर या महाशयांना तोंडावर सांगितले की तुझी भाजप सोबत pratnarship असल्याचे पुरावे माझ्या कडे आहेत….
अजून काय पुरावा पाहिजे….. ????
आजही आपल्या या Partnar (भागीदार) पदाधिकाऱ्यांच संपर्क कार्यालय
भाजप समर्थकांच्या बिल्डिंग मध्ये आहे..
आणि याच बिल्डींग चा मालक जामनेर येथील 200 कोटी चा घोटाळा झालेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स चा ठेकेदार आहे… आणि या ठेकेदाराचे Pratnar ( भागीदार) आपले हे महाशय आहेत आहे…
बोला आता काय काय सांगणार… बर मी खोटा बोलेल समजा….
पणपक्षाचे जेष्ठ नेते आ. खडसे साहेबांची ही हीच माहिती आहे
_____________हनी ट्रॅपच्या बाबतीत बोलायला लाऊ नका नाहीतर समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही
आम्ही तुमचीच स्वतः हाची कुटुंब व्यवस्था उध्वस्त होईल म्हणून आम्ही शांत आहोत ते राहू द्या…..नाहीतर हनी ट्रॅपच्या आदल्या दिवशी कोणत्या फ्लॅट (कोणती महिला) वर काय घडलं…
मध्यस्थी ला किती पैसे दिले….
कोणाला मोबाईल दिला…
मनी ट्रॅप फासला; म्हणून कसा हनी ट्रॅप रचला….
सगळच बाहेर काढेल ….
झाकली मूठ सव्वा लाखाची च ठेवा…
विषय तुमची कुटुंब व्यवस्था उध्वस्त होण्याचा आहे म्हणून नाहीतर सगळ कधीच उध्वस्त करून टाकल असतं…
माझी आई 6/7 दिवस ICU मधे होती नंतर तिचे निधन झाले.. त्यात मला गाफील ठेऊन माझे एकतर्फी निलंबन करून घेतले तरी मी शांत बसलो माझ्या 20 वर्षाच्या पक्ष मेहनती वर पाणी फेरल मी शांतच बसलो……
सदर पोस्ट व्हाट्सअपच्या विविध ग्रुप वर टाकली गेलेली आहे. यावर अभिषेक पाटील यांनी आरोप फेटाळले आहे. परंतु जामनेरच्या त्या दोनशे कोटींचा कॉम्प्लेक्स घोटाळ्यात आता अभिषेक पाटील यांचेही नाव येईल की काय हे बघणे महत्त्वाचे ठरेल.