जळगाव मनपा महिला व बाल कल्याण विभाग तर्फे स्त्री संसाधन केंद्राची समिती गठीत
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । जळगाव शहरातील महिलांसाठी शासकीय योजना राबविण्यासाठी जळगांव महानगरपालिका अंतर्गत महिला बाल कल्याण कार्यालय मार्फत शासकीय योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता शासन निर्णय २०१९/प्र.क्र.७५ का.१० अंतर्गत श्री संसाधन केंद्र ही शासकीय योजना जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत व महिला बाल कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे. समिती केंद्राच्या प्रभावी अंमल बजावणी व मनुष्य बळ नियुक्ती करण्याकरीता समिती गठीत करण्यात आली आहे.
सदर समितीत नागरी समाज संघटनेचे प्रतिनिधी म्हणून निवेदिता ताठे मनिषा पाटील व सामाजिक संस्थेच्या वतीने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.जमील देशपांडे, आर्या फाऊंडेशनच्या सौ.छाया पाटील आदींची निवड करण्यात आली.
मनपा आयुक्त सौ.विद्या गायकवाड यांनी स्वाक्षरी असलेले निवडपत्र देण्यात आले. मनपा अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांचा हस्ते निवडपत्र देण्यात आले. यावेळी महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी पांडुरंग पाटील उपस्थित होते.