आयुक्त इन ऍक्शन : डॉ. विद्या गायकवाड यांनी ‘टेस्टिंग हॅमर’द्वारे केली गुणवत्तेची तपासणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । जळगाव महानगरपालिकेने नुकतेच काँक्रीट टेस्टिंग करिता ‘टेस्टिंग हॅमर’ हे उपकरण खरेदी केले असून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी त्याद्वारे स्थळ निरीक्षणाद्वारे आणि काँक्रीट टेस्टिंगची गुणवत्ता तपासणी करत कामाची पाहणी केली.
महानगरपालिकेने काँक्रीट टेस्टिंग करिता ‘टेस्टिंग हॅमर’ हे उपकरण खरेदी केले असून त्याद्वारे काँक्रीट टेस्टिंगची गुणवत्ता तपासणी मक्तेदाराने महापालिका प्रशासनाकडे मागणी केलेल्या/सादर केलेल्या देयकात करण्यात येत आहे.
त्यानुसार आज दि 1 जून रोजी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सर्वे नं.118 गणपती मंदिर परिसरात मोकळ्या जागेत केलेल्या पेविंग ब्लॉकच्या कामाची तसेच पिंपळा येथील गट नं 5/1,5/2 अष्टभुजा नगर येथील मोकळ्या जागेत केलेल्या पेविंग ब्लॉकच्या कामाची, गुणवत्तेची स्थळ निरीक्षणाद्वारे पाहणी केली. याप्रसंगी शहर अभियंता नरेंद्र जावळे तसेच संबंधित मक्तेदार आणि प्रतिनिधींची उपस्थिती होती.
“संबंधित शाखा अभियंता, JE व मक्तेदार/ प्रतिनिधी यांना कामासंबंधी कुठल्याही प्रकारची तडजोड कामात केली जाणार नाही. कामाची गुणवत्ताही वर्क ऑर्डरमध्ये नमूद केलेल्या विभागणी नुसारच करावी लागेल. याबाबत कुठलीही तडजोड स्वीकारली जाणार नाही.” अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.