भुसावळ

भुसावळ पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेश, एकाला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । भुसावळ शहरातील विविध भागात मध्यरात्री पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात शहरातील विविध भागात मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात पोलिसांनी 9 अटक वॉरंट बजावणी करून संबंधितांना अटक केली तर जामिीनकीचे 14 वॉरंट बजाविण्यात आले. अवैध दारू विक्रेत्यांविरूध्द, जुगार खेळणार्‍यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले तर पोलिसांना पाहिजे असलेल्या 16 संशयीतांची तपासणी केल्यानंतर केवळ एकच संशयीत पोलिसांना गवसला.

शहरात शुक्रवारी रात्री 10 ते पहाटे 2 वाजेपर्यंत भुसावळ शहर पोलीस स्टेशन,बाजारपेठ पोलीस स्टेशन व तालुका पोलिस स्टेशन हद्दीमध्ये डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेवरून ऑलआऊट ऑपरेशन राबवण्यात आले. अटक वारंटची बजावणी, विविध गुन्ह्यांमधील पाहिजे असणारे आरोपींचा शोध घेवून अटक करणे, रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच हिस्ट्री सीटर्स तपासणे, तडीपार आरोपी तपासणे तसेच दारूबंदी, जुगार कायद्याखाली कारवाया करणे, रात्रीच्या वेळी शहरात फिरणार्‍या संशयित व्यक्तींची विचारपूस करणे आदी विविध पोलिस विषयक बाबींच्या कारवायांसाठी कोम्बिंग राबवण्यात आले. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहूल गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोदकुमार गोसावी आदी दुय्यम अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.

कोम्बिंगमध्ये नऊ अटक वॉरंट बजावणी तर 14 बेलेबल वॉरंट बजावणी करण्यात आली तसेच 76 समन्स बजावणी करण्यात आली व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत 8ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले. तीन ठीकाणी जुगारावर कारवाई होवून 33 हिस्ट्रीसीटरपैकी 21 जण मिळून आले. दारू पिऊन वाहन चालविणार्‍या सहा जणांविरूध्द शहर वाहतूक शाखेने कारवााई केली. शाळांच्या परीसरात तंबाखू जन्य पदार्थ विक्री करणार्‍या 20 टपरी व्यवसायीकांविरूध्द कारवाई करण्यात आली. रात्री संशयीतरित्या फिरणार्‍या एका जणास अटक करण्यात आली. 16 वाण्टेडपैकी एकाला अटक करण्यात आली तर मोटार व्हेईकल अ‍ॅक्टअन्वये 14 वाहनांवर कारवाई झाली. 13 हद्दपारांपैकी एकही घरी आढळला नाही.

शहरातील कृष्णा खरारे याला एक वर्षासाठी जळगाव जिल्हयातून हद्दपार करण्याचे आदेश प्रांतांधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढले असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. शहर पोलिस ठाण्याकडून हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर प्रांत रामसिंग सूलाणे यांनी हद्दपारीचे आदेश काढले. प्रांत कार्यालयात अजूनही हद्दपारीच्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू असल्याने उपद्रवींच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button