⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

खुशखबर ! दिवाळीपूर्वी नंदुरबारमार्गे भुसावळ-सातारा एक्स्प्रेस धावणार, ‘या’ स्थानकांवर असणार थांबा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२३ । खान्देशातील (Khandesh) प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच दिवाळीपूर्वी अमळनेर, नंदुरबारमार्गे भुसावळ-सातारा (Bhusawal Satara Railway) रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिंदखेडा येथे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

भुसावळ-सुरत मार्गावरील कामांच्या पाहणीसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विशेष रेल्वेने जात असताना नंदुरबार व शिंदखेडा येथे काही काळ थांबले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, जळगाव-उथना दरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम उत्कृष्ट झाले आहे, आता तिसरी लाइन टाकण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, शिवाय दिवाळीपूर्वी भुसावळ- सातारा रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दानवे यांनी दिले.

दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या तापी सेक्शनवर पुण्याला जाण्यासाठी गाडी नसल्याने, प्रवाशांना खासगी अथवा महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा लागतो. त्यातही खान्देश प्रवाशांसाठी सोयीची असलेली भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस देखील काही काळापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यातच खान्देशातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण लक्षात घेता दिवाळीपूर्वी अमळनेर, नंदुरबारमार्गे भुसावळ-सातारा रेल्वे सुरु करण्यात येईल अशी माहिती दानवे दिले.

रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात संघटनेने शिंदखेडा-पुणे रेल्वे सुरू करावी अशी मागणी केली असता, दानवे यांनी शिंदखेडा-पुणे ऐवजी भुसावळ- सातारा ही रेल्वे गाडी दिवाळीपूर्वी सुरु करणार असल्याचे सांगितले.

या स्थानकांवर असणार थांबा
ही गाडी जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, नंदुरबार, नवापूर भेस्तानमार्गे वसईरोड, कल्याण, कर्जत, लोणवळा, पुणेमार्गे साताच्याला जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या तापी सेक्शनवर पुण्याला जाण्यासाठी गाडी नसल्याने, प्रवाशांना खासगी अथवा महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा लागतो. मात्र भुसावळ-सातारा रेल्वे सुवा झाल्यास खान्देशातील प्रची सोय होणार आहे.