जळगावकरांसाठी खुशखबर! कोईम्बतूर–जयपूर विशेष ट्रेन सुरु, जाणून घ्या वेळापत्रक अन् थांबे?

एप्रिल 10, 2026 2:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी आणि वेटिंग लिस्टचा त्रास लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. दक्षिण भारत आणि राजस्थानला जोडणारी कोइम्बतूर – जयपूर साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गाडीला जळगाव आणि भुसावळ या दोन्ही महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

train

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०६१८१ कोइम्बतूर–जयपूर विशेष ही गाडी ९ एप्रिल ते ४ जून या कालावधीत दर गुरुवारी दुपारी २:३० वाजता कोइम्बतूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३५ मिनिटांनी भुसावळला तर दुपारी २.१० वाजता जळगाव स्थानकावर पोहोचेल. यानंतर तिसऱ्या दिवशी दुपारी १:२५ वाजता जयपूर येथे पोहोचेल.

तसेच गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर–कोइम्बतूर विशेष ही गाडी १२ एप्रिल २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत दर रविवारी रात्री १०:०५ वाजता जयपूर येथून सुटेल आणि तर दुसऱ्या दिवशी रात्री ७.३५ मिनिटाने जळगावला तर रात्री ८.१० मिनिटाने भुसावळ स्थानकावर पोहोचेल. यांनतर चौथ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता कोइम्बतूर येथे पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा?

या विशेष गाडीला तिरुपूर, इरोड, सेलम, जोलारपेट्टई, काटपाडी, रेनिगुंटा, कडप्पा, येरागुंटला, गूटी, ढोणे, कुरनूल सिटी, गडवाल, महबूबनगर, काचेगुडा, कामरेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, भरूच, वडोदरा, गोधरा, रतलाम, जाओरा, मंदसोर, निमच, चित्तौड़गड, भिलवाडा, बिजाईनगर, नशिराबाद, अजमेर आणि किशनगड ही स्थानके दोन्ही दिशांना असतील.

डब्यांची रचना: १८ – वातानुकूलित (AC) थ्री-टायर डबे, आणि २ – सामान व ब्रेक व्हॅन्स

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now