⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा ‘असा’ घ्या लाभ!

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022 ची सविस्तर माहित पाहणार आहोत. त्यामध्ये आपण योजनेची उद्दिष्ट्य, अनुदान किती मिळणार?, अर्ज कुठे करायचा?, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?, अटी, पात्रता, लाभार्थी निवडीचे निकष कोणते याबाबतची सर्व आपण आज पाहणार आहोत.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची उद्दिष्ट्ये : राज्यातील बरेच शेतकरी शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांनी शेती करतात, त्यामध्ये ते खूप खर्च करतात . त्याचे इंधन खूप महाग आहेत. ही गोष्ट लक्षात घेता, राज्य सरकारने ही योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली असून, राज्य सरकार या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देणार आहेत.

या योजनेचा लाभ कोणाला होईल? :
या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकार २५ हजार सौर जलपंपांचे वितरण करणार असून, दुसर्‍या टप्प्यात ५० हजार सौर पंपांचे वितरण करणार आहे.
तिसर्‍या टप्प्यात राज्य सरकार २५ हजार सौर पंपांचे राज्यातील शेतकऱ्यांना वाटप करणार आहे.
५ एकरपेक्षा कमी शेतजमिनी असलेल्या सर्व शेतकर्‍यांना ३ एचपी आणि त्या पेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपी सौर पंप या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे यापूर्वी वीज जोडणी आहे, त्यांना या योजनेंतर्गत सौर पंपचा लाभ दिला जाणार नाही.
लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्र राज्यातील असला पाहिजे.
पाण्याचे स्रोत असलेले शेतकरी या योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहेत. तथापि, पारंपारिक वीज जोडणी असणाऱ्या शेतक्यांना या योजनेतून सौरपंपाचा लाभ मिळणार नाही.
आदिवासी आणि दुर्गम भागातील शेतकरी जे पारंपारिक उर्जा म्हणजेच महावितरण कंपनीचे विद्युतीकरण करीत नाहीत. अशा प्रदेशातील शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
जल स्रोतामध्ये नदी, विहीर, स्वत:ची आणि सार्वजनिक शेती तलाव इ. जल स्रोत म्हणून ग्राह्य धरले जातील.
ज्या खेड्यांमध्ये अद्याप वनविभागातील एनओसीमुळे शेतकरी विद्युतीकरण झाले नाहीत. अशा भागातील शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? :
आधार कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, शेतातील कागदपत्रे.
पत्ता पुरावा, मोबाइल नंबर, बँक खाते पासबुक.

या योजनेसाठी अर्ज कोठे करावा? : या योजनेंतर्गत आपल्या सोलर पंपाद्वारे सिंचनासाठी सौर पंप लाभ घेण्यास पात्र आणि इच्छुक लाभार्त्यांनी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सध्या अर्ज सुरु आहेत.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.