मोठी बातमी : जिल्ह्यात शिंदे गटाला संजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे करणार दौरा?
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२२ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लवकरच जळगाव जिल्हा दौरा करणार आहेत.यावेळी ते जळगाव जिल्हा शिंदे गटाची कार्यकारणी जाहीर करणार आहेत. मात्र या दौऱ्याबाबत अजून कोणतेही अधिकृत घोषणा झालेली नाही.
जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाची अजून कोणतीही कार्यकारिणी नाही. मात्र तब्बल पाच महिन्यांनी शिवसेना शिंदे गटाची जिल्ह्याची कार्यकारणी तयार झाली आहे. ती जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौरा करणार आहेत असे म्हटले जात आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट देखील घेतल्याच्या चर्चा आहेत. मात्र त्यांच्या स्विय सहायकाने याला दुजोरा दिला नाही.
शिवसेनेच्या जुन्या संकल्पेप्रमाणेच शिवसेना शिंदे गटाचीही संघटनात्मक बांधणी राहणार असून, जिल्ह्यात चार जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात २ व रावेर लोकसभा मतदारसंघात २ जिल्हाप्रमुखांचा समावेश राहणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात तालुकाप्रमुख व जळगाव शहरासाठी महानगरप्रमुख अशी नियुक्ती केली जाणार आहे. यासह महिला आघाडीच्याही नियुक्त्या केल्या जाणार आहे.
जळगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाचे संघटन कमी असून, हे संघटन वाढवण्यासाठी जळगाव शहराची जंबो कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे. यामध्ये महानगरप्रमुख म्हणून निलेश पाटील यांची निवड जवळपास निश्चित असून, जिल्हाप्रमुख म्हणून माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची नियुक्ती होवू शकते. यासह आमदार किशोर पाटील यांनाही पक्षाकडून जिल्हाप्रमुखपद दिले जाण्याची शक्यता आहे.