जळगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्या भव्य रोड शो; ‘या’ मार्गांवरून होणार मार्गक्रमण?

जानेवारी 5, 2026 5:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२५ । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार ६ जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो जळगाव शहरात आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करणार आहेत.

devendra fadanvis

या मार्गांवरून होणार मार्गक्रमण?

Advertisements

देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो हा जळगाव शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. यानंतर नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, गोलाणी मार्केट या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेच त्याचा समारोप होणार आहे. या रोड शोमध्ये महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, प्रमुख नेते, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असून, जळगाव शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Advertisements

हा रोड शो केवळ निवडणूक प्रचारापुरता मर्यादित नसून, जळगाव शहराच्या विकासाबाबतचा विश्वास आणि भविष्यातील प्रगतीचा संकल्प असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. व्यापारी, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये या रोड शोबाबत मोठी उत्सुकता असून, मार्गावर ठिकठिकाणी स्वागताची तयारी सुरू आहे.

महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा महानगर) मनोज भांडारकर यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now