सत्तांतरावेळीच्या क्लिप माझ्या कडे, बाहेर काढली तर… – नितीन देशमुख
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । सत्तांतराच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे. सरकार पाडण्याचे षडयंत्र हल्लीचे नव्हते. मागील दीड वर्षांपासून षडयंत्र सुरू होते.ज्यांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवले. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत. असे आमदार नितीन देशमुख म्हणले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. यामुळे राज्यात अभूतपूर्व सत्तांतर झाले होते.राज्यात पैशांच्या मदतीने सत्तांतर झाले असून मी ते सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन असेही आमदार नितीन देशमुख म्हणाले.
उद्धव ठाकरे भेटत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्हाला वाचवायची होती. बाळासाहेबांचे विचार आम्हाला वाचवायचे होते, असे काही नेते सांगतात. मात्र त्यांच्या आवाजाची क्लिप जर मी बाहेर काढली तर खरं काय ते समोर येईल. पैशांच्या मदतीने सत्तांतर झाले असून मी ते सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन असेही आमदार नितीन देशमुख म्हणाले.