⁠ 
सोमवार, मे 6, 2024

पाचोरा नगरपालिका प्रशासनाने आदर्श घ्यावा असा आर्यन ग्रुपच्या तरुणांचा अभिनव उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । मान्सूनची पूर्व तयारी म्हणुन नगरपालिकेकडून शहरात नालेसफाईसह सर्व शहरात साफसफाई व इतर तयारी होणे अपेक्षित होते. परंतु शहरात तसे कुठेच दिसुन येत नाही. परंतु समाजाशी आपली एक बांधीलकी ठेवत पाचोरा शहरातील तमान सामाजिक सेवा करणार्‍या तरूणांचा ग्रुप आर्यन युवा फाउंडेशनतर्फे शहरातील एकमेव हिंदु स्मशानभुमित या कोरोना महामारिच्या काळात जे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ते आर्यन ग्रुप च्या तरुणांनी स्वच्छता मोहिमेतुन स्वच्छ करून समाजासमोर नवीन आदर्श उभा केला आहे.

स्मशानभूमीतील व परिसरातील या घाणीच्या साम्राज्यामुळे या परिसरात दुर्गंधी वाढली होती.लवकरच मान्सूनचे आगमन होणार असुन येणार्‍या काळात पावसामुळे त्या भागातिल घाण उचलणे व स्वच्छता करण्या संदर्भात अनेक अडचणी उभ्या राहू शकल्या असत्या तसेच त्या घाणीमुळे साथीचे आजार व परिसरातिल तसेच शहरातिल नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होउ शकतो हे लक्ष्यात घेऊन आर्यन युवा फाउंडेशन तर्फे २४ मे रोजी पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देउन ही व्यथा मांडली होती.

त्यांनी दोन दिवसात ही समस्या सोडउ असे आश्वाशितही केले होते. पण आज १२ दिवस होउनही नगरपालिका प्रशासनाने या विषयाचे गांभिर्य लक्षात घेउन कोणतिही उपाययोजना केली नाही.या १२ दिवसाच्या कालावधित आम्हि मुख्याधिकारी यांचेशी सतत संपर्क साधला पण त्यांनी फक्त अश्वासन दिले. प्रत्यक्षात कोणतीही कृती झाली नाही.नगरपालिकेने पाचोरा शहरातिल स्वच्छतेचा ठेका ज्यांना दिला आहे.

त्यांच्याशीही ह्या तरुणांनी संपर्क साधला माञ त्यांनीही वेळ काढुपणा केला.या अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानी कारभारा विरूध्द आजच मा.जिल्हाधिकारी साहेब व वरिष्ठ अधिकारी,लोकप्रतिनीधी यांना तक्रारी करण्यासाठी आर्यन युवा फाउंडेशन चे पदाधिकारी सज्ज झाले असले तरी शहराचे सुज्ञ नागरिक म्हणुन राष्टपिता महात्मा गांधी यांच्या गांधिगीरी मार्गाने आर्यन  युवा फाउंडेनशचे पदाधिरकाऱ्यांनी आज दि.०५/०६/२०२१ शनिवार रोजी शहरातिल एकमेव हिंदु स्मशानभुमितील व परिसरातील घाणीची स्वच्छता करून एक अभिनव उपक्रम राबविला आहे.ही गांधीगीरी केल्यावरही पाचोरा नगरपालिका प्रशासन जे झोपेचे सोंग घेउन झोपी गेले आहे. ते जागे झाले नाही तर पुढिल वेळेस हा कचरा सबंधित अधिकारी यांचे दालनात व नगरपालिका प्रशासकिय इमारतीच्या आवारात आणुन टाकण्याचे धाडसही आर्यन युवा फाउंडेशनतर्फे करण्यात येईल. असे या तरुणांकडून सांगण्यात आले.

तरी आजच्या या आर्यन युवा फाउंडेशनच्या या गांधीगीरी उपक्रमात सहभागी होउन.स्वच्छ व सुरक्षित शहर  या मोहीमेत अध्यक्ष आर्यन मोरे, उपाध्यक्ष भूषण पाटील, सचीव आनंद शिंदे,अशोक मोरे, मोहीत देवरे,  दिपक सोनवणे सोयगाव तालूका अध्यक्ष भूषण पाटील,वरखेडी अध्यक्ष निशांत वणारसे ,सारोळा अध्यक्ष दिपक पाटील ऋषीकेश कोळी,शूभम पाटील, सोहिल तलवार, हेमंत भोई, मनोज भोई, देवेंद्र देवरे,निलेश पाटिल,तेजस देवरे, बबलू अंभोरे, किरण पाटिल, (नानू) राहूल पाटील,ललीत पाटिल,रोहित सूतार,अनिकेत चौधरी, शारूख शाह, पवन शिंदे, रोहिदास गायकवाड,सोमनाथ पाटिल, मयूर बारी, अवीनाश शिंदे,गोपाल भडांगे,कौशल निकम,यांनी सहभागी होऊन जे नगरपालिका प्रशासनाचे करावयास हवे ते काम करून दाखवल्याने आता तरी नगरपालिका झोपेतून जागे होऊन मान्सून पूर्व तयारीस लागून लोकांच्या जीवाशी खेळणे थांबवले का हा प्रश्न उपस्थित होत आहे.