---Advertisement---
जळगाव शहर

विकासकामांच्या निधीवरून नगरसेवक व नगरसेविका पतीमध्ये महापौर दालनात धक्काबुक्की

jalgaon-manapa
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । महापालिकेतील सत्ताधारी भाजपतील अतंर्गत वाद दिवसेंदिवस वाढतच आहेत. प्रभाग ८ मधील नगरसेवक व नगरसेविका पतीत कामांच्या वाटपावरून हमरीततुमरी झाल्याचा प्रकार महापौर दानात घडला. शाब्दीक बाेलचालीपासून सुरू झालेला वाद थेट धक्काबुक्कीपर्यंत पोहचला असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

jalgaon-manapa

काही दिवसांपूर्वीच भाजपचे गटनेते भगत बालाणी आणि नगरसेविकेची पती भरत सपकाळे यांच्यात वाद झाला होता. यानंतर आता नगरसेवक चंद्रशेखर पाटील आणि नगरसेविका प्रतीभा पाटील यांचे पती वसंत पाटील यांच्यात शुक्रवारी महापौरांच्या दालनामध्ये वाद झाला. यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.

---Advertisement---

गेल्या दाेन महिन्यात नगराेत्थान याेजनेतंर्गत मुलभूत विकास कामांसाठी राज्य शासनाने महापालिकेला निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत प्रभाग क्रमांक ८मध्ये दीड काेटींचा निधी खर्च केला जाणार आहे. दीड काेटींच्या निधीत ७० टक्के निधी राज्य शासन तर ३० टक्के निधी मनपा खर्च करणार आहे. या निधीतून डाॅ. चंद्रशेखर पाटील यांनी विकास कामांचे नियाेजन केले आहे.

यावरून दोघे नगरसेवकांमध्ये मतभेद आहेत. हा निधी विशिष्ट भागातच खर्च हाेत असल्याने नगरसेविका प्रतिभा पाटील यांचे पती सुधीर पाटील यांनी काही निधी निमखेडी भागात खर्च करण्याची सूचना केली; परंतु निधीचे संपूर्ण नियाेजन स्वत: करणार असल्याचा पवित्रा डाॅ. पाटील यांनी घेतल्याने दाेघांत वाद निर्माण झाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---