गांजा तपासणी अधिकारी असल्याचे सांगत कन्हेरच्या शेतकर्‍याला लुटले!

नोव्हेंबर 17, 2022 2:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । पारोळा तालुक्यातील कन्हेरे गावातील शेतकरी गावाकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन संशयीतांनी गांजा-अफू तपासणी करणारे अधिकारी असल्याचे सांगत शेतकर्‍याची झडती घेत पिशवीतील एक लाखांची रोकड घेवून पोबारा केला. ही घटन तालुक्यातील रामनगर तांडा गावाजवळ घडली. याबाबत पारोळा पोलिसांत अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon crime 1 3 jpg webp

सविस्तर असे की, शेतकरी सुरेश पंडित पाटील (52, कन्हेरे, ता.पारोळा) हे मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील तांडा फाट्याजवळ गावाकडे पायी जात असताना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून आले व त्यांनी आम्ही गांजा/अफू चेक करणारे अधिकारी असल्याचे सांगत शेतकर्‍याच्या हातातील कापडी पिशवी चेक केली. त्यात एक लाख रुपये असल्याने हे पैसे कशाचे आहेत ? असे विचारल्यावर मी बँकेतून काढले असल्याचे शेतकरी सुरेश पाटील यांनी सांगितले.

त्यावर ‘आम्ही चेक करू’ असे बोलून त्यांनी एक लाख रुपये घेऊन दुचाकीवरून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश पाटील यांनी पारोळा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now