⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

इम्नान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । पाकिस्तानमध्ये मंगळवारी देशाचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्नान खान यांना अटक करण्यात आली आहे.यामुळे पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरु झाले आहे.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात पाकिस्तानात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी इम्रान समर्थकांनी जाळपोळ सुरु केली आहे.

इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयाच्या गेटमध्ये प्रवेश करण्याआधीच रेंजर्सनी कोर्ट परिसरातून इम्रान यांना ताब्यात घेतले. पीटीआयचे अझहर मशवानी यांनी इम्रान यांना रेंजर्सनी कोर्टाच्या आतून अपहरण केले असा आरोप केला आहे. या घटनेनंतर पीटीआयकडून देशभरात कार्यकर्त्यांना तात्काळ निदर्शने करण्याचे आवाहन करण्यात आले होते.