---Advertisement---
एरंडोल

नागरिकांनो.. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्या!

---Advertisement---

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत एरंडोल पंचायत समितीतर्फे अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यासांठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अशा दोन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.ई.जाधव यांनी केले आहे.

jalgaon 2022 10 12T194348.072

या योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू असून सदरची नोंदणी ही महा ॲग्री डी बी टी या पोर्टलवर सुरू आहे शेतकरी पोर्टल अर्ज करण्यासाठी फक्त शेतजमीन व बँक डिटेल माहिती लागते. ऑनलाइन लॉटरी पद्धत ने निवड झाल्यावर पुढील प्रमाणे कागदपत्रे पोर्टल ऑनलाईन करणे आवश्यक आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदर योजनेबाबत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे व जिल्हा कृषी अधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी माहिती कृषी अधिकारी भरत बोरसे यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभ पुढील प्रमाणे आहेत.

---Advertisement---

नवीन विहीर – २,५०,०००/-
जुनी विहीर दुरुस्ती – ५०,०००/-
विज आकार रक्कम रु. १०,०००/-
वीज पंप संच रक्कम रु. २०,०००/-
पीव्हीसी पाईप रक्कम रु. ३००००/-
ठिबक संच रक्कम रु. ५००००/-

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा, खाते उतारा, जातीचा दाखला, दीड लाखाच्या मर्यादेत चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयकृत, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, ग्रामसभेचा ठराव इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी पंचायत समिती एरंडोल यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---