दोन वर्षीय मुलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्यास नागरीकांनी चोपले

एप्रिल 14, 2022 2:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । पाचोरा तालुक्यात वास्तव्यास असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्याला नागरिकांनी रंगेहात पकडत चांगला चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

crime 2

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील रहिवासी २ वर्षीय मुलगी मंगळवार दि १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास खेळत असताना तेथेच राहणारा सुभाष महादू महाजन हा चिमुकलीसोबत अंगावरील कपडे काढून अश्लिल चाळे करत होता. लहान मुलीस तिची आई शोधाशोध करत सुभाष महाजन याच्या घरात घसुल्यावर हा प्रकार उघडकीस आला. हि बाब नागरीकांना समजल्यावर संतप्त नागरीकांनी संशयिताला पकडून चांगला चोप दिला. पिडीत चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित सुभाष महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे या करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now