नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, 14 जण ठार; मृतांमध्ये जळगावातील भाविकांचा समावेश?

ऑगस्ट 23, 2024 3:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२४ । नेपाळमधून बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस नेपाळमधील तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून यातील काही भाविक हे जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आले आहे.

nepal bus

याबाबत असे की, केसरवानी ट्रॅव्हल्सची ही बस (UP 53 FT 7623) गोरखपूरहून नेपाळला गेली होती.बस पोखराहून काठमांडूला जात होती. त्यावेळी बस तणाहून जिल्ह्यातल्या मार्सयांगडी नदीच्या पात्रात कोसळली. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडला. या बसमध्ये ४० प्रवासी स्वार होते. यातील १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, इतर अन्य १६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्या १४ जणांपैकी काही जण हे जळगाव जिल्ह्यातील वरणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील भाविक नेपाळ दर्शनासाठी 15 ऑगस्ट रोजी रवाना झाल्या होत्या. भाविक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या. मात्र त्यांच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय.

तसेच या अपघाताबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मला काही तासाभरापूर्वी ही घटना समजली आहे. मी संबंधित गावाचे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आताच सर्व गोष्टी जाहीर करणं शक्य नाही. पण आम्ही तिथल्या सर्व यंत्रणांसोबत आम्ही संपर्कात आहोत. असं ते म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now