⁠ 
बुधवार, मे 8, 2024

चाळीसगावकरांनो.. लाभ घ्या, तुमच्यासाठी मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर!

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । देशाच्या स्वतंत्र ७५व्या अमृतमहोत्सव निमित्त चाळीसगाव बचाव कृती समिती व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच रयत सेना चाळीसगाव यांच्या सोबतीने तालुक्यातील गरजू व गरीब रुग्णांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबीर दि. २० रोजी आयोजित करण्यात आले आहे. तालुक्यातील गरजू व गरीब रुग्णांसाठी या मोफत शिबिराचा लाभ घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील भौतिक परिस्थिती बघता येथील उत्पनाचे साधन अल्प असून त्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती सदन नाहीये. देशाच्या स्वतंत्र ७५ व्या अमृतमहोत्सव निमित्त सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबीर अभियानासाठी तज्ञ डॉक्टर पुणे व मुंबई येथून येणार आहेत. या शिबिरात रुग्णाच्या तपासणी करून औषध उपचार केले जातील तसेच ज्यांना शस्त्रक्रियेची आवशकता असल्यास मुंबईस्थित नामवंत रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

शिबिरात किमान वीस प्रकारच्या आजाराचे निदान होणार असून शिबिरात येणाऱ्या पहिल्या ३०० रुग्णांसाठी मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. तसेच दमा अस्थमा तपासणी च्या संदर्भातील औषध उपचार व पंप मोफत मिळतील. तसेच दमा साठी लागणारे ब्रेथोमिटर व कानाचे मशीन अल्प दारात मिळणार आहे. कर्क रोग संदर्भात नोंदणी रुग्णांनी ९८२३८६०३३३ या क्रमाकावर करावा. तालुक्यातील गरजू व गरीब रुग्णांसाठी या मोफत शिबिराचा लाभ घ्या, असे आवाहन चाळीसगाव बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल देशमुख व रयत सेनाचे संता निकुंभ यांनी केले आहे.