भडगाव नागरिकांकडून पालिकेकडे स्वच्छतेची मागणी

एप्रिल 25, 2022 4:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । भडगाव शहरातील हकीम नगर, कुरेशी वाडा, जमादार वाडा, पठाण वाडा, बाडी मोहल्ला, जकातदार गल्ली, खोल गल्ली भागात नियमित स्वच्छता हाेत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याबाबत नागरिकांकडून निवेदन देऊन पालिकेकडे स्वच्छतेची मागणी.

nagarpalika bhadgav jpg webp

यावेळी लवकरच घाणीच्या समस्येसह सर्व प्रश्न साेडवण्याचे आश्वासन नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले. नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रभागांमध्ये नियमित स्वच्छता हाेत नाही. परिणामी रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. कारण काही दिवसांपासून हकीम नगर, जमादारवाडा, बाडी मोहल्ला, पठाणवाडा, कुरेशी वाडा, जकातदार गल्ली, खोल गल्ली या ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी होत नसल्याने डास, मच्छरांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. यामुळे आरोग्यास धोका होऊ शकतो, असे असीम ग्रुप मित्र मंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now