जळगाव जिल्हा

नागरिकांनो सावधान…जिल्ह्यात यलो अलर्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । मान्सून महाराष्ट्रात दाखल असल्याने राज्याचा २० टक्के भाग व्यापला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अद्याप ३-४ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला दोन दिवसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरासह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. आज देखील जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी त्यापूर्वी अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनच्या प्रवासासाठी योग्य वातावरण असले तरी त्यामध्ये जोर नसल्याने मान्सूनला विलंब होत आहे. नाशिकमध्ये मान्सून पोहाेचण्यासाठी १३ किंवा १४ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर धुळे, जळगाव, नगर, सांगली, मराठवाडा या परिसरात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण असणार असल्याचे हवामानतज्ज्ञ यांनी सांगितले आहे.

दरम्यान, काल रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यादरम्यान, शनिवारी चोपडा तालुक्यातील जुना-नवा गाव या पाड्यावरील पिंटू कामसिंग पावरा यांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर रावेर तालुक्याला शनिवारी वादळाचा तडाखा बसला. त्यामुळे केळीच्या बागा आडव्या झाल्या.

या जिल्ह्यांत १५ पर्यंत पावसाचा यलो अलर्ट
अमरावती, अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिधुुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड.

Related Articles

Back to top button