जळगाव जिल्हा

Winter Is Coming : जळगावात आठवड्याचा शेवटच्या दिवसात तापमानात होणार घट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यात थंडीची चाहूल वाढली आहे. यातच आता आठवड्याचा शेवटच्या दिवसात तापमान घसरण आहे. तापमान १३ अंशाखाली जाईल असे म्हणले जात आहे. यामुळे नागरिकांनी आता स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, उत्तरेतील बहुतांश राज्यांत थंडीचा कहर वाढला आहे. त्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे जळगावात या आठवड्याच्या शेवटची तापमान १३ अंशांखाली जाईल. असे म्हटले जात आहे.

राज्यात ढगाळ वातावरणाने सुरू झाल्या या आठवडयात वातावरणात मोठे बदल झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, वातावरण ढगाळ आहे. मध्य महाराष्ट्रात तापमानात घसरण झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात थंडी वाढली असताना उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १६.३ अंशांवर आहे. येत्या चार दिवसांत या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात शनिवारी किमान तापमानाचा पारा १३ अंशांखाली जाऊ शकतो. वाढत्या थंडीचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवरही होऊ शकतो. धुक्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा इंडेक्स वाढू शकतो.असे म्हटले जात आहे.

किमान तापमानामध्ये घट होत असताना पुढील चार दिवसांत कमाल तापमान ३५ अंशावरून ३३ अंशाखाली येऊ शकते. त्यामुळे दिवसाचा उकाडा कमी होऊन गारठा जाणवेल. मंगळवारी जळगावात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. त्यात तीन-चार अंशांनी घट होईल. जळगावात मंगळवारी वातावरण काहीसे ढगाळ होते. दुपारी ४ वाजता आकाश ५१ टक्के ढगाच्छादित होते. त्यामुळे दिवसा सूर्याच्या अतिनील किरणाचा (यूव्ही) इंडेक्स पाच वर होता. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाल्याचे जाणवत होते. सायंकाळी थंड वारे होते.

Related Articles

Back to top button