⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | नोकरी संधी | 12 पाससाठी खुशखबर! CISF मध्ये 1130 जागांसाठी भरती, पगार 69100 मिळेल..

12 पाससाठी खुशखबर! CISF मध्ये 1130 जागांसाठी भरती, पगार 69100 मिळेल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बारावी पास असलेल्या उमेदवारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. CISF ने कॉन्स्टेबल फायरमन या पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलीय. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहेत. CISF च्या https://cisfrectt.cisf.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज कर्णयची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे.

अधिसूचनेनुसार, फायर कॉन्स्टेबलच्या 1130 रिक्त जागांपैकी 466 जागा सामान्य श्रेणीसाठी आहेत. तर, 144 EWS, 153 SC, 161 ST, 236 जागा OBC साठी राखीव आहेत. या भरतीची तपशीलवार सूचना लवकरच CISF वेबसाइटवर अपलोड केली जाईल.

या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. 30 सप्टेंबरपासून वयाची गणना केली जाईल. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात पाच वर्षांची आणि ओबीसींना तीन वर्षांची सूट मिळेल.
शैक्षणिक पात्रता: 12वी(विज्ञान) उत्तीर्ण
शारीरिक पात्रता: उंची: 170 सेमी, छाती: 80-85 सेमी

अशी होईल निवड प्रक्रिया :
CISF मध्ये कॉन्स्टेबल फायरमन पदासाठी निवड शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीनंतर केली जाईल. प्रथम शारीरिक चाचणी होईल. यानंतर लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारे राज्यनिहाय स्वतंत्र गुणवत्ता जाहीर केली जाईल.
अर्ज फी
सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना कॉन्स्टेबल फायरमन भरतीसाठी अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
तुम्हाला किती पगार मिळेल?
CISF मधील कॉन्स्टेबल फायरमनला लेव्हल-3 (21700-69100) वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.