⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

CISF मध्ये तब्बल 787 जागांसाठी मेगाभरती ; 10वी पास उमेदवारांना गोल्डन चान्स..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 10वी पाससाठी नोकरीची मोठी संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये काही जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र उमेदवाराने दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 असणार आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 21 नोव्हेंबर 2022 असणार आहे. CISF Recruitment 2022

एकूण पदसंख्या : ७८७

या पदांसाठी होणार भरती?
कॉन्स्टेबल/कुक
हवालदार / मोची
हवालदार / शिंपी
कॉन्स्टेबल / नाई
कॉन्स्टेबल/वॉशर मॅन
कॉन्स्टेबल / सफाई कामगार
कॉन्स्टेबल / पेंटर
कॉन्स्टेबल/ मेसन
कॉन्स्टेबल / प्लंबर
कॉन्स्टेबल/माळी
कॉन्स्टेबल / वेल्डर

शैक्षणिक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण असावा. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा :
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 22 वर्षे असावे.

निवड कशी होईल?
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

अर्ज शुल्क :
सामान्य, OBC आणि EWS – 100 रु
SC/ST/EX – कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

अधिकृत संकेतस्थळ : www.cisf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा